Sand pumping rules :६०० रुपयात मिळणार १ ब्रास वाळू !
वाळू चा अवैध उपसा व सामान्य लोकांची आर्थिक पिळवणूक होऊ नये म्हणून राज्य सरकार ने , वाळू उपसा नियम जाहीर केला आहे.
या नियमानुसार मात्र ६०० रुपयांमध्ये 1 ब्रास वाळू मिळणार आहे .तर जाणून घेऊयात काय आहेत नियम .
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला नक्की जॉईन व्हा आणि पहा नवीन अपडेट्स
या नवीन धोरणानुसार, सर्वसामान्य नागरिकांना 600 रुपये प्रती ब्रास किंवा 133 रुपये प्रती मेट्रिक टन इतक्या दरानं वाळू मिळणार आहे. वाळू वाहतुकीचा खर्च मात्र नागरिकांना करावा लागणार आहे.
६०० रुपयात वाळू मिळवण्यासाठी अर्ज करण्यास
नागरिकांना स्वस्तात वाळू (रेती) मिळावी आणि अवैध वाळू उपशाला आळा बसावा म्हणून महाराष्ट्र सरकारने महत्तवाचे ऐतिहासिक नवीन वाळू धोरण जाहीर केले आहे.
Sand pumping rules : त्याची अंमलबजावणी १ मेपासून होईल, अशी घोषणा झाली, मात्र राष्ट्रीय हरित लवादाचे निकष व राज्याच्या वाळू धोरणातील अटी, टप्प्यांमुळे ऑक्टोबर-नोव्हेंबरनंतरच वाळू मिळणार आहे.
त्यातही वाहतुकीचा खर्च लाभार्थीलाच करावा लागेल.‘आरटीओ’च्या माध्यमातून ट्रॅक्टर, ट्रकसाठी किलोमीटरनिहाय वाहतूक दर किती असावा, हे निश्चित होईल.
तत्पूर्वी, नदी पात्रातील वाळू गटाचे निरीक्षण करण्यासाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक समिती नेमली जाईल.
👉अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
प्रत्येक तालुक्यासाठी प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय वाळू संनियंत्रण समिती तर जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती असेल.
त्यात मुख्य कार्यकारी अधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, पोलिस आयुक्त, जलसंपदा व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, आरटीओ, भूजल व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आणि भू-विज्ञान व खनिकर्म विभागाचे अधिकारी आहेत.
वाळूचे ठिकाण निश्चित केल्यावर संबंधित ग्रामसभेचा ठराव लागतो. ग्रामसभेने ठराव नाकारल्यास प्रांताधिकारी त्यावर निर्णय घेतील, असे निकष आहेत.
mahadbt farmer list: महाडीबीटी योजना तुषार ठिबक सिंचन ! एप्रिल 2023 यादी जिल्ह्यानुसार पहा.
वाळूसंदर्भात ठळक बाबी…
१ एका कुटुंबाला मर्यादा :१० ते १२ ब्रास.
२ अर्ज करण्याची प्रक्रिया : ‘महाखनिज’ वेबसाईटवर करता येईल अर्ज.
३ वाळू मिळण्याची मुदत : १५ दिवस
४ एक ब्रासचा दर : ६०० रुपये
५ वाहतूक खर्च : स्वत: अर्जदारालाच करावा लागेल.
mahadbt farmer list: महाडीबीटी योजना तुषार ठिबक सिंचन ! एप्रिल 2023 यादी जिल्ह्यानुसार पहा.