गाय गोठा अनुदान योजना 2023
गाय गोठा योजना PDF
गोठ्याची रचना
शेपटीपुढे शेपटी पद्धत
या पद्धतीमध्ये जनावरांना धुण्यासाठी व दूध काढण्यासाठी दोन्ही ओळींमधील जागा अधिक उपयोगी पडते. जनावरांचे तोंड बाहेरच्या बाजूस असल्याने संसर्गजन्य रोग होण्याची शक्यता कमी असते, तसेच बाहेरच्या बाजूने ताजी हवा मिळते. दूध काढणाऱ्यांवर देखरेख करणे सोपे जाते. माजावरील जनावरे सहज ओळखता येतात.
तोंडाकडे तोंड पद्धत
तोंडाकडे तोंड करून बांधलेल्या जनावरांचे योग्य पद्धतीने निरीक्षण करता येते. गोठ्याच्या दोन्ही बाजूस मोकळी जागा असल्यामुळे सूर्यप्रकाश भरपूर मिळतो. जनावरांना चारा टाकणे सोपे जाते. रोगप्रसार कमी प्रमाणात होतो.