बीबीएफ पेरणी यांत्रिकीकरण साठी अर्ज कसा करायचा पहा !
शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असलेले घटक मागणी केल्यावर तातडीने उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात मागेल त्याला शेततळे योजनेचा विस्तार करण्यात येऊन मागेल त्याला
फळबाग, ठिबक / तुषार सिंचन, शेततळे, शेततळ्याचे अस्तरीकरण, शेडनेट, हरितगृह, आधुनिक पेरणीयंत्रे (BBF) आणि कॉटन श्रेडर देण्यात येईल.
रुंद सरी वाफा पेरणी. म्हणजेच बीबीएफ पेरणी यंत्र . साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा पहा.
बीबीएफ पेरणी यांत्रिकीकरण साठी अर्ज कसा करावा पहा
शेतकऱ्यांना सदर घटक / बाब कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रचलित योजनांतर्गत व त्यांच्या अर्थसंकल्पीय तरतूदीतुन उपलब्ध करुन देण्यात येईल
वरील योजनांसाठी अनुज्ञेय असलेले अनुदान संबंधित शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न असलेल्या बँक खात्यावर सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे वर्ग करण्यात येईल.
कृषी यांत्रिकीकरण साठी येथे ऑनलाइन अर्ज करा
या योजनेंतर्गत लाभ देताना अर्जदाराने / शेतकऱ्याने मागणी केलेल्या घटकाचा यापूर्वी शासनाच्या कोणत्याही योजनेंतर्गत लाभ घेतलेला असणार नाही याची खातरजमा केली जाईल.
उपरोक्त घटकांच्या वाटपासाठी आवश्यक निधी सन २०२३ – २४ या आर्थिक वर्षाकरीता संबंधित प्रचलित योजनेमधून उपलब्ध करुन दिलेल्या अर्थसंकल्पीय तरतूदीमधून भागवावा व उपरोक्त घटकांच्या मागणीनुसार अतिरिक्त निधीची आवश्यकता असल्यास त्याकरिता मागणी करावी असे निर्देश ही या शासन निर्णयात देण्यात आले आहेत.
mahadbt farmer list: महाडीबीटी योजना तुषार ठिबक सिंचन ! एप्रिल 2023 यादी जिल्ह्यानुसार पहा.