Mahadbt Tractor Subsidy yojana – ट्रॅक्टर खरेदीवर 80% पर्यंत सबसिडी लाभ कसा घ्यावा अर्ज कुठे व कसा करावा पहा
नमस्कार शेतकरी बंधूंना आजच्या लेखात आपण पाहणार आहोत की ट्रॅक्टर सबसिडी कशी घ्यायची तर मित्रांनो वरच्यावर शेती आधुनिकीकरण यांत्रिकीकरण वाढल्यामुळे शेतीला अनेक अवजारे लागतात यासाठी शासन अनेक योजना राबवत आहे त्या योजनेतून शेतकऱ्यांना लागणारी साधने सहजासहजी उपलब्ध व्हावेत आणि ती काही कमी खर्चात उपलब्ध व्हावे या हेतूने शासनाने महाडीबीटी पोर्टल अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत योजना राबवल्या जातात यामध्ये शेतकऱ्यांना लागणारे ट्रॅक्टर पावर टेलर स्वयंचलित काही वाहने फवारणी यंत्र नांगर रोटावेटर ट्रॉली अशा अनेक शेतीला लागणारे अवजारे महाडीबीटी पोर्टल अंतर्गत कमी पैशात मिळतात वर शासन त्यावर प्रोत्साहन पर सबसिडी म्हणजेच अनुदान देते. त्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल.
ट्रॅक्टर अनुदान अर्ज व नोंदणी करण्यासाठी
👇
प्रत्येक वेगवेगळ्या योजना साठी शासन वेगवेगळ्या प्रमाणात अनुदान देते. जसं की ट्रॅक्टर साठी 70 टक्के ठिबक सिंचन 80 टक्के कृषी पंप 60 टक्के 60-65 टक्के तुषार सिंचन पाईपलाईन 70-90 टक्के अशा वेगवेगळ्या प्रमाणात शासन शेती अवजारे व काही शेतीत लागणारे संच यासाठी शासन अनुदान देत आहे या अनुदानाचा फायदा घेण्यासाठी सुरुवातीला शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल वरती आपली नोंदणी करून घेणे आवश्यक आहे आणि या पोर्टल अंतर्गत आपल्याला पाहिजे त्या योजना शेती निगडित साहित्य अवजारे यासाठी आपण अर्ज करू शकतो अर्ज केल्यानंतर अर्जासाठी लागणारी कागदपत्रे पहा अर्जासाठी
ठिबक सिंचन 80 टक्के कृषी पंप 60 टक्के 60-65 टक्के तुषार
सिंचन पाईपलाईन 70-90 टक्के अनुदान अर्ज,करण्यासाठी
अर्जासाठी लागणारे कागदपत्र शेतकऱ्याचे आधार कार्ड सातबारा आठ-अ बँकेचे पासबुक इत्यादी कागदपत्र अपलोड करण्यासाठी लागतात शेतकऱ्याचा adhar mobile link आधारला मोबाईल नंबर लिंक असल्यास अधिकच सोपे होते त्यामुळे आधार ला मोबाईल लिंक असणे खूप गरजेचे आहे म्हणजे प्रत्येक वेळी तुम्हाला बायोमेट्रिक पद्धत वापरण्याऐवजी मोबाईल ओटीपी वर देखील तुमचे काम होऊ शकते
सुरुवातीला महाडीबीटी पोर्टल वरती तुम्हाला तुमची प्रोफाईल तयार करायची जवळच्या सीएससी केंद्रावर किंवा आपले सेवा सरकार सेवा केंद्रावर जाऊन तुम्हाला mahadbt महाडीबीटी पोर्टल वरती वेगवेगळ्या योजना साठी फॉर्म भरता येईल शेतीसाठी लागणारे ठिबक सिंचन असो तुषार सिंचन, पाईप लाईन, ट्रॅक्टर, रोटावेटर, नांगर, छोटे ट्रॅक्टर, मळणी यंत्र, शेड, शेततळ्याचे कापड, कापणी यंत्र, डाळ मिल, अशाप्रकारे तुम्हाला पाहिजे ते साहित्य शेती उपयोगी संच या अंतर्गत अनुदानाचा लाभ प्रत्येक शेतकऱ्याला घेता येईल. agriculture technology
ट्रॅक्टर अनुदान अर्ज व नोंदणी करण्यासाठी
👇👇
अनुदानाचे पद्धत लॉटरी पद्धतीने काढले जातात यामध्ये शेतकऱ्याचे आधार कार्ड सातबारा बँक पासबुक इत्यादी कागदपत्र आवश्यक आहेत वेगवेगळ्या योजनांसाठी वेगवेगळे अनुदान या अंतर्गत दिले जाते सविस्तर माहितीसाठी खाली अधिकृत वेबसाईट लिंक दिलेले आहे त्यावर जाऊन सविस्तर माहिती प्रक्रिया पाहू शकता धन्यवाद.
अधिकृत वेबसाईट – https://mahadbtmahait.gov.in/Farmer/Login/Login